अनुक्रमणिका

Friday, October 3, 2025

TET परीक्षा 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ झाली आहे.


 TET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ झाली. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025

Sunday, September 14, 2025

We learn English भाग 17

 WLE 17

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*

  

🔵 📢 We Learn English 📢


        *🔴  आजचा भाग 17  🔴*


*We Learn English Part 17*

*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 17*


Read carefully the following sentences and write down in your notebook. (रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक) 

खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे. 


1) Shut the door.(शट् द डोअर) 

दरवाजा बंद कर.

2) Shut the window.(शट् द विंडो) 

खिडकी बंद कर.

3) I have a dog.(आय हॅव अ डॉग) 

माझ्याकडे कुत्रा आहे. 

4) This is my dog.(दिस ईज माय डॉग) 

हा माझा कुत्रा आहे. 

5) This is Mangala's dog. (दिस ईज मंगलास डॉग) 

हा मंगलाचा कुत्रा आहे. 

6)  This is her dog. (दिस ईज हर डॉग) 

हा तिचा कुत्रा आहे. 

7) This is my book. (दिस ईज माय बुक) 

हे माझे पुस्तक आहे. 

8) This is his book. (दिस ईज हिज् बुक) 

हे त्याचे पुस्तक आहे. 

9) This is my sharpener. (दिस ईज माय शार्पनर) 

हे माझे टोकयंत्र आहे. 

10) This is her notebook. (दिस ईज हर नोटबुक) 

ही तिची वही आहे. 


*सरावासाठी खालील प्रश्नांची उत्तरे लिही.* 

(वस्तू तुझ्याकडे असेल तर Yes, I do असे लिही. वस्तू तुझ्याकडे नसेल तर No, I don't असे लिही.)

1) Do you have a ruler? (डू यू हॅव अ रूलर?) 

तुझ्याकडे फुटपट्टी आहे का? 

Answer -  

2) Do you have a Sharpener? (डू यू हॅव अ शार्पनर ?) 

तुझ्याकडे टोकयंत्र आहे का? 

Answer -  


*प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते लक्षात घे आणि वहीत लिहून घे व योग्य वेळी त्याचा वापर कर.*

1) Whose book is this? (हुज् बुक ईज दिस?) 

हे पुस्तक कोणाचे आहे? 

Answer (उत्तर खालीलप्रमाणे) 

स्वतःचे पुस्तक असेल तर.. 

This is my book. 

मित्राचे पुस्तक असेल तर... 

This is his book. 

मैत्रिणीचे पुस्तक असेल तर.. 

This is her book. 

एक गोष्ट लक्षात घे की वरीलप्रमाणे whose चा प्रश्न आला तर.... 

स्वतःसाठी my शब्द वापरतात. 

दुसर्‍या मुलासाठी his शब्द वापरतात व

 मुलीसाठी her वापरतात.


*तुला वर्गात काही स्वतःच्या वस्तू तसेच इतरांच्या दाखवून खालीलप्रमाणे प्रश्न विचारता येतील.* 

1) Whose pen is this? (हुज् पेन ईज दिस?) 

हे कोणाचे पेन आहे? 

2) Whose notebook is this? (हुज् नोटबुक ईज दिस?) 

ही कोणाची वही आहे? 

3) Whose sharpener is this? (हुज् शार्पनर ईज दिस?) 

हे कोणाचे टोकयंत्र आहे? 

4) Whose pencil is this? (हुज् पेन्सिल ईज दिस?) 

ही कोणाची पेन्सिल आहे? 

5) Whose ruler is this? (हुज् रूलर ईज दिस?) 

ही कोणाची फुटपट्टी आहे? 



Tuesday, September 2, 2025

आम्ही इंग्रजी शिकतो भाग 15

 WLE 15

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*

  

🔵 📢 We Learn English 📢


        *🔴  आजचा भाग 15  🔴*


*We Learn English Part 15*

*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 15*


Read carefully the following questions and write down in your notebook. (रीड केअरफुली द फॉलविंग क्वेशन्स अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक) 

खालील प्रश्न काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे. 


1) Whose book is this? (हुज बुक ईज दीस?) 

हे कोणाचे पुस्तक आहे? 

Answer - This is Ram's book. (दीस ईज रामस् बुक) 

हे रामचे पुस्तक आहे. 

2) Whose notebook is this? (हुज नोटबुक ईज दीस?) 

ही कोणाची वही आहे? 

Answer - This is Raju's notebook. (दीस ईज राजूस् नोटबुक) 

ही राजूची वही आहे. 

3) Whose pencil is this? (हुज पेन्सिल ईज दीस?) 

ही कोणाची पेन्सिल आहे? 

Answer - This is Arohi's pencil. (दीस ईज आरोहीस् पेन्सिल ) 

ही आरोहीची पेन्सिल आहे. 

4) Whose ruler is this? (हुज रूलर ईज दीस?) 

ही कोणाची फुटपट्टी आहे? 

Answer - This is Prachi's ruler. (दीस ईज प्राचीस् रूलर) 

ही प्राचीची फुटपट्टी आहे. 

5) Whose rubber is this? (हुज रबर ईज दीस?) 

हे कोणाचे खोडरबर आहे? 

Answer - This is Nitin's rubber. (दीस ईज नितीनस् रबर) 

हे नितीनचे खोडरबर आहे. 


*खालील शब्द वाच आणि ते वापरून वरीलप्रमाणे Whose...... चे प्रश्न तयार कर व उत्तरे लिही.*


1) House (हाऊस) - घर

2) Car ( कार) - मोटारकार 

3) School Bag. (स्कूल बॅग) - दप्तर 

4)  Eraser (इरेझर) - खोडरबर

5) Sharpener (शार्पनर) - टोकयंत्र 

6) Pen (पेन) - पेन

7) Motorcycle (मोटरसायकल) 

8) Handkerchief (हॅण्डकरचिफ) - हातरूमाल 


*एखाद्या मुलाची वस्तू त्याचे नाव न घेता कशी सांगाल?*

This is his book.(दीस ईज हीज् बुक) 

हे त्याचे पुस्तक आहे. 


*एखाद्या मुलीची वस्तू तिचे नाव न घेता कशी सांगाल?*

This is her notebook.(दीस ईज हर नोटबुक) 

ही तिची वही आहे.

नद्या व त्यांची उगमस्थाने

 🚨 *नदया व त्यांचे उगमस्थान* 🎯


गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )


यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )


सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )


तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )


महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )


ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )


व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )


गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक


कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )


साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )


रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )


पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )


🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, August 28, 2025

प्रश्नमंजुषा

 *आवश्यक वाटलं तर लक्ष द्या*


◾️भारतातील पहिले 100% साक्षर राज्य :- केरळ


◾️भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य :- सिक्कीम


◾️प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य :- त्रिपुरा


◾️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य :- दिल्ली


◾️भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य :- हिमाचल प्रदेश


◾️भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य :- दिल्ली


◾️भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य :- प. बंगाल


◾️मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य :- सिक्किम


◾️GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- आसाम


◾️'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य :- कर्नाटक


◾️भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य :- सिक्किम


◾️निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य :- पंजाब


◾️सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य :- केरळ


◾️कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य :- कर्नाटक


◾️बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य :- हरियाणा


◾️पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य :- राजस्थान


◾️मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य :- पंजाब


◾️सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य :- मध्य प्रदेश


◾️ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य :- दिल्ली


◾️ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य :- दिल्ली


◾️ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य :- आंध्र प्रदेश


◾️भारतातील पहिले ई-न्यायालय :- हैद्राबाद उच्च न्यायालय


◾️ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य :- गुजरात


◾️जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :-मेघालय


◾️पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य :- तेलंगणा


◾️भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य :- दिल्ली


◾️होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य :- राजस्थान


◾️स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य :- महाराष्ट्र


🌼🌼🌼🌼🌼

We learn English पार्ट 14

 WLE 14

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*

  

🔵 📢 We Learn English 📢


          *🔴  आजचा भाग 14  🔴*


*We Learn English Part 14*

*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 14*


🟣 *Read the following words and write down in your notbook.*

*खालील शब्द वाच आणि वहीत लिहून घे.*


1) Book ( बुक) - पुस्तक 

2) Notebook (नोटबुक) - वही

3) School Bag. (स्कूल बॅग) - दप्तर 

4) Ruler (रूलर) - फुटपट्टी 

5)  Rubber (रबर) - खोडरबर 

6)  Eraser (इरेझर) - खोडरबर

7) Sharpener (शार्पनर) - टोकयंत्र 

8) Pen (पेन) - पेन

9) Pencil (पेन्सिल) - पेन्सिल 


*तुझ्या दप्तरातकाय काय आहे त्यांची उत्तरे लिही.*

जर वस्तू असेल तर Yes, I do. असे लिही. 

जर वस्तू नसेल तर No, I don't असे लिहावे. 

उदा. Do you have a Pencil in your school bag ? (डू यू हॅव्ह अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग ?) 

तुझ्या दप्तरात पेन्सिल आहे का? 

Answer - Yes, I do. 


1) Do you have a pen in your school bag? (डू यू हॅव्ह अ पेन इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

2) Do you have a book in your school bag? (डू यू हॅव्ह अ बुक इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

3) Do you have a Sharpener in your school bag? (डू यू हॅव्ह अ शार्पनर इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

4) Do you have a eraser in your school bag? (डू यू हॅव्ह अ इरेझर इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

5) Do you have a ruler in your school bag? (डू यू हॅव्ह अ रूलर इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

6) Do you have a notebook in your school bag? (डू यू हॅव्ह अ नोटबुक इन युअर स्कूल बॅग ?) 

Answer - 

7) How many notebooks do you have? (हाऊ मेनी नोटबुक्स डू यू हॅव?) 

तुझ्याकडे किती वह्या आहेत? 

Answer - I have............ notebooks. 

8) How many books do you have? (हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव?) 

तुझ्याकडे किती पुस्तके आहेत? 

Answer - I have............ books.

Tuesday, August 19, 2025

Part 12 We learn English

 WLE 12

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*

  

🔵 📢 We Learn English 📢 


         *🔴  आजचा भाग 12  🔴*


*We Learn English Part 12*

*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 12*


🟣 *खालील वाक्ये वाच वाच आणि वहीत लिहून घे.*


1) Open the door(ओपन द् डोअर)

     दरवाजा उघड.

2)  Open the Window. (ओपन द् विंडो)

     खिडकी उघड.

3)  Open the Cupboard. (ओपन द् कबर्ड)

      कपाट उघड.

4)  This is a Table. ( दिस ईज अ टेबल)

     हे टेबल आहे..

5)  This is a Chair. (दिस ईज अ चिअर)

    ही खुर्ची आहे.

6)  This is a door (दिस ईज अ डोअर)

     हा दरवाजा आहे.

7) This is a Cot.(दिस ईज अ कॉट)

हा पलंग आहे.

8) This is a window.(दिस ईज अ विंडो)

     ही खिडकी आहे. 

9) This is a Cow. (दिस ईज अ काऊ) 

    ही गाय आहे. 

10) This is a House. ( दिस ईज अ हाऊस)  

    हे घर आहे. 

   

Read the following questions and write the answers. (खालील प्रश्न वाच आणि त्याचे उत्तर लिही.)

  

1) What is this? (वॉट ईज दिस?) 

     हे काय आहे? 

Answer - This is a Car.(दिस ईज अ कार) 

उत्तर - ही कार आहे. 


खाली काही शब्द देत आहे. ते वापरुन वरील प्रश्नाप्रमाणे प्रश्न तयार कर व उत्तरे लिही. 

Blackboard 

Pen

Tree

Pencil 

Sharpener 

Bag

Rular

Wall

Chair

Picture 

Bus

Cycle 

Radio 

Book

Slate

Friday, August 15, 2025

Monday, August 11, 2025

साहित्यिक व त्यांची टोपण नावे.

 *🗓️ साहित्यिक व त्यांची टोपण नावे.*


◾ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी


◾ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी


◾ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन


◾ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी


◾ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत


◾ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार


◾ नारायण मुरलीधर गुप्ते - बी


◾ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू


◾ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम


◾ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी


◾ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज


◾ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस


◾ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी


◾ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी


◾ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व


◾ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व


◾ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास


◾ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी


◾ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार


◾ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर


◾ ना. धो. महानोर - रानकवी


◾ न. चि. केळकर - साहित्यसम्राट


◾ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन


◾ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज


◾ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी


🌼🌼🌼🌼🌼

Sunday, August 10, 2025

We Learn English

 

WLE 9
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*
 
🔵 📢 We Learn English 📢 🔵

            *🔴  आजचा भाग 9   🔴*

*We Learn English Part 9*
*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 9*

*Tell me about yourself .(टेल मी अबाउट युवरसेल्फ)*
*स्वतःबद्दल माहिती सांग.(वहीत लिहून घे)*

खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून स्वतःबद्दल माहिती पूर्ण कर.
My name is.........
(माय नेम ईज........)
I am........
(आय अॅम.......)
I live in.....
(आय लिव्ह इन........)
I go to .......
(आय गो टू.......)
I am in class...........
(आय अॅम इन क्लास.........)
My father's name is........
(माय फादर्स नेम ईज.......)
My father is a...........
(माय फादर ईज अ.........)
My mother's name is............
(माय मदर्स नेम ईज......)
My mother is a..........
(माय मदर ईज अ........)
I have.............brother.
(आय हॅव्ह............. ब्रदर)
My brother's name is...........
(माय ब्रदर्स नेम ईज.........)
I have............. sister.
(आय हॅव्ह.............. सिस्टर)
My sister's name is...........
(माय सिस्टर्स नेम ईज........)

एक मुलगा खाली माहिती सांगत आहे ती बघ आणि स्वतःची माहिती बरोबर लिहिली का याची खात्री करून घे.
My name is Raju.
I am Ten.
I live in Pimpri Avaghad.
I go to Z. P. Primary school Pimpri Avaghad.
I am in class four.
My father's name is Ram.
My father is a Driver.
My mother's name is Rani.
My mother is a House wife.
I have one brother.
My brother's name is Ganu.
I have one sister.
My sister's name is Didi.

Sunday, August 3, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेस माजी विद्यार्थी 1992व1993 कडून 20,000 रकमेची साऊंड सिस्टम भेट देण्यात आली.

 * *जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेल्या इयत्ता चौथीच्या सन 1993- 94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून केंद्रशाळा वाकडीस साऊंड सिस्टिम सप्रेम भेट...*

--------------------------------------------

जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून एक आदर्श उपक्रमाची सुरुवात... 🌹🌹

--------------------------------------------

*आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी येथे शिकलेल्या सण 1993-94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी उत्कृष्ट क्वालिटीची साऊंड सिस्टिम सप्रेम भेट आज देण्यात आली, यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा.कोते हे होते, यावेळी इयत्ता चौथीच्या 1993- 94 च्या बॅचमध्ये मान.श्री राजेंद्र आहेर, श्री अण्णासाहेब कोते, श्री. महेश म्हस्के ,सौ.कांचनताई गोंदकर, सौ.मायाताई शेळके, सौ.प्रेरणाताई बोठे, श्री. विजय आहेर आदि माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आलेल्या सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून दिला, आज या शाळेत शिकून आम्ही सर्वच विद्यार्थी एका चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहोत तसेच काहीजण स्वतःचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करीत आहेत यासाठी आम्ही याच जिल्हा परिषद शाळेत शिकून आज मोठे झाले आहोत त्यामुळे आम्ही या शाळेचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आम्ही आज शाळेसाठी भेटवस्तू देत आहोत, यावेळी सौ.कांचनताई गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, आता आपल्या शाळेत झालेला बदल पाहून खूप मोठा आनंद झाला असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच  दत्तगुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विजय आहेर यांनी सांगितले की शाळेच्या विकासासाठी आम्हाला केव्हाही हाक द्या आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले, या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिवटे सर, श्री.भालके सर, श्री. ईडलवार सर, श्री. जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ कुमावत ताई ,स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, मा.स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.निलेश लहारे, स्कूल कमिटी सदस्य श्री.प्रदीप जगदाळे, श्री. श्रीकांत साबळे, श्री. दीपक वेताळ, श्री. दिगंबर कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक, पालक श्री.सचिन खजिनदार यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बनसोडे सर यांनी केले, शेवटी सर्व मान्यवरांचे आभार श्री. भालके सर यांनी मानले......*


*वाकडी शाळेला १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेची भेट; साउंड सिस्टीम देत आदर्श प्रेरणा!*


*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक;करा..👇*

 *https://ahilyanagarkhabarbaat.com/?p=6986*

Saturday, August 2, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता येथे अण्णासाहेब कोटे माजी विद्यार्थी तथा उद्योजक यांच्या देणगीतून सेल्फी पॉइंटचे उद्घाटन झाले

 ✴✴✴✴✴✴✴✴✴

*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेत आज शाळेच्या नावाचे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.....*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी शाळेत शाळेसाठी आवश्यक  भौतिक सुविधा बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत, उर्वरित आवश्यक गोष्टींसाठी शाळेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे शाळेच्या गुणवत्तेत खूप वाढ झालेली आहे,आता शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू आहे,शाळेच्या प्रगतीत वाढ झाल्यामुळे पालकांचा या शाळेकडे प्रवेशासाठी ओघ वाढू लागलेला आहे, अशावेळी शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेच्या नावाचे सेल्फी बोर्ड शाळेचे माजी विद्यार्थी, वाकडी येथील शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी उपलब्ध करून दिला, शाळेच्या विकासामध्ये श्री अण्णासाहेब पा.कोते यांचे मोठे योगदान आजपर्यंत झालेले आहे, यावेळी त्यांचा यथोचित सत्कार शाळेचे आजी-माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला, आज झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी 👉I ❤ my school  Z. P. P. S wakadi👈 या सेल्फी पॉईंट चे अनावरण वाकडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथनाना ठमके यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या अनावरण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री विजय सदाफळ, श्री वाल्मीक लहारे, श्री दिगंबर कोते, श्री प्रमोद जाधव, श्री अमोल कापसे, स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, उपाध्यक्ष होले ताई, माजी अध्यक्ष श्री निलेश लहारे, मुख्याध्यापक श्री दिवटे सर, स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत साबळे, श्री सुनील खडके, श्री दीपक वेताळ, सदस्य पवार ताई, श्री गोरक्षनाथ बोकंद, श्री विलास म्हस्के, शाळेतील शिक्षक श्री बनसोडे सर, श्री भालके सर, श्री ईडलवार सर, श्री घोडके सर ,श्री जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ.कुमावत ताई आदि शिक्षकवर्ग, पालकवर्ग, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते, या सेल्फी बोर्ड साठी शाळेचे माजी अध्यक्ष निलेश लहारे यांनी विशेष प्रयत्न केले, शाळेच्या विकासासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, स्कूल कमिटी सदस्य यांचे पण मोलाचे योगदान आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर यांनी केले तर आभार श्री भालके सर यांनी मानले.....*

Saturday, June 28, 2025

Names of different Parts of body

 https://youtu.be/cM-SscYFEfY?feature=shared


English Song number- 6


Names of Different  Part of Body


1)Head 🧒

2)Hair 

3) Forehead 

4) Eyes 👀

5) Eyelashes

6) Eyebrows

7) Temples 

8) Nose 👃

9) Lips 💋

10)Tongue 👅

11) Teeth 🦷

12) Mouth 🗣️

13) Chin

14) Cheeks 

15)Ears 👂

16)Neck

17) Shoulders 

18) Arm 💪

19) Elbow 

20) Hand ✋ 

21) Wrist 

22) Fingers 👋

23)Palm

24)Thumb👍

25) Chest 

26) Stomach 

27)Navel

28)Waist

29)Back

30)Thigh

31) Knees 

32)Feet

33) Toe 

34)Heel

35) Ankle