अनुक्रमणिका

Sunday, August 3, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेस माजी विद्यार्थी 1992व1993 कडून 20,000 रकमेची साऊंड सिस्टम भेट देण्यात आली.

 * *जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेल्या इयत्ता चौथीच्या सन 1993- 94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून केंद्रशाळा वाकडीस साऊंड सिस्टिम सप्रेम भेट...*

--------------------------------------------

जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून एक आदर्श उपक्रमाची सुरुवात... 🌹🌹

--------------------------------------------

*आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी येथे शिकलेल्या सण 1993-94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी उत्कृष्ट क्वालिटीची साऊंड सिस्टिम सप्रेम भेट आज देण्यात आली, यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा.कोते हे होते, यावेळी इयत्ता चौथीच्या 1993- 94 च्या बॅचमध्ये मान.श्री राजेंद्र आहेर, श्री अण्णासाहेब कोते, श्री. महेश म्हस्के ,सौ.कांचनताई गोंदकर, सौ.मायाताई शेळके, सौ.प्रेरणाताई बोठे, श्री. विजय आहेर आदि माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आलेल्या सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून दिला, आज या शाळेत शिकून आम्ही सर्वच विद्यार्थी एका चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहोत तसेच काहीजण स्वतःचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करीत आहेत यासाठी आम्ही याच जिल्हा परिषद शाळेत शिकून आज मोठे झाले आहोत त्यामुळे आम्ही या शाळेचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आम्ही आज शाळेसाठी भेटवस्तू देत आहोत, यावेळी सौ.कांचनताई गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, आता आपल्या शाळेत झालेला बदल पाहून खूप मोठा आनंद झाला असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच  दत्तगुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विजय आहेर यांनी सांगितले की शाळेच्या विकासासाठी आम्हाला केव्हाही हाक द्या आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले, या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिवटे सर, श्री.भालके सर, श्री. ईडलवार सर, श्री. जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ कुमावत ताई ,स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, मा.स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.निलेश लहारे, स्कूल कमिटी सदस्य श्री.प्रदीप जगदाळे, श्री. श्रीकांत साबळे, श्री. दीपक वेताळ, श्री. दिगंबर कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक, पालक श्री.सचिन खजिनदार यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बनसोडे सर यांनी केले, शेवटी सर्व मान्यवरांचे आभार श्री. भालके सर यांनी मानले......*


*वाकडी शाळेला १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेची भेट; साउंड सिस्टीम देत आदर्श प्रेरणा!*


*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक;करा..👇*

 *https://ahilyanagarkhabarbaat.com/?p=6986*

No comments:

Post a Comment