WLE 17
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
✍️ *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*
🔵 📢 We Learn English 📢
*🔴 आजचा भाग 17 🔴*
*We Learn English Part 17*
*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 17*
Read carefully the following sentences and write down in your notebook. (रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक)
खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.
1) Shut the door.(शट् द डोअर)
दरवाजा बंद कर.
2) Shut the window.(शट् द विंडो)
खिडकी बंद कर.
3) I have a dog.(आय हॅव अ डॉग)
माझ्याकडे कुत्रा आहे.
4) This is my dog.(दिस ईज माय डॉग)
हा माझा कुत्रा आहे.
5) This is Mangala's dog. (दिस ईज मंगलास डॉग)
हा मंगलाचा कुत्रा आहे.
6) This is her dog. (दिस ईज हर डॉग)
हा तिचा कुत्रा आहे.
7) This is my book. (दिस ईज माय बुक)
हे माझे पुस्तक आहे.
8) This is his book. (दिस ईज हिज् बुक)
हे त्याचे पुस्तक आहे.
9) This is my sharpener. (दिस ईज माय शार्पनर)
हे माझे टोकयंत्र आहे.
10) This is her notebook. (दिस ईज हर नोटबुक)
ही तिची वही आहे.
*सरावासाठी खालील प्रश्नांची उत्तरे लिही.*
(वस्तू तुझ्याकडे असेल तर Yes, I do असे लिही. वस्तू तुझ्याकडे नसेल तर No, I don't असे लिही.)
1) Do you have a ruler? (डू यू हॅव अ रूलर?)
तुझ्याकडे फुटपट्टी आहे का?
Answer -
2) Do you have a Sharpener? (डू यू हॅव अ शार्पनर ?)
तुझ्याकडे टोकयंत्र आहे का?
Answer -
*प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते लक्षात घे आणि वहीत लिहून घे व योग्य वेळी त्याचा वापर कर.*
1) Whose book is this? (हुज् बुक ईज दिस?)
हे पुस्तक कोणाचे आहे?
Answer (उत्तर खालीलप्रमाणे)
स्वतःचे पुस्तक असेल तर..
This is my book.
मित्राचे पुस्तक असेल तर...
This is his book.
मैत्रिणीचे पुस्तक असेल तर..
This is her book.
एक गोष्ट लक्षात घे की वरीलप्रमाणे whose चा प्रश्न आला तर....
स्वतःसाठी my शब्द वापरतात.
दुसर्या मुलासाठी his शब्द वापरतात व
मुलीसाठी her वापरतात.
*तुला वर्गात काही स्वतःच्या वस्तू तसेच इतरांच्या दाखवून खालीलप्रमाणे प्रश्न विचारता येतील.*
1) Whose pen is this? (हुज् पेन ईज दिस?)
हे कोणाचे पेन आहे?
2) Whose notebook is this? (हुज् नोटबुक ईज दिस?)
ही कोणाची वही आहे?
3) Whose sharpener is this? (हुज् शार्पनर ईज दिस?)
हे कोणाचे टोकयंत्र आहे?
4) Whose pencil is this? (हुज् पेन्सिल ईज दिस?)
ही कोणाची पेन्सिल आहे?
5) Whose ruler is this? (हुज् रूलर ईज दिस?)
ही कोणाची फुटपट्टी आहे?
No comments:
Post a Comment