अनुक्रमणिका

Saturday, August 2, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता येथे अण्णासाहेब कोटे माजी विद्यार्थी तथा उद्योजक यांच्या देणगीतून सेल्फी पॉइंटचे उद्घाटन झाले

 ✴✴✴✴✴✴✴✴✴

*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेत आज शाळेच्या नावाचे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.....*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी शाळेत शाळेसाठी आवश्यक  भौतिक सुविधा बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत, उर्वरित आवश्यक गोष्टींसाठी शाळेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे शाळेच्या गुणवत्तेत खूप वाढ झालेली आहे,आता शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू आहे,शाळेच्या प्रगतीत वाढ झाल्यामुळे पालकांचा या शाळेकडे प्रवेशासाठी ओघ वाढू लागलेला आहे, अशावेळी शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेच्या नावाचे सेल्फी बोर्ड शाळेचे माजी विद्यार्थी, वाकडी येथील शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी उपलब्ध करून दिला, शाळेच्या विकासामध्ये श्री अण्णासाहेब पा.कोते यांचे मोठे योगदान आजपर्यंत झालेले आहे, यावेळी त्यांचा यथोचित सत्कार शाळेचे आजी-माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला, आज झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी 👉I ❤ my school  Z. P. P. S wakadi👈 या सेल्फी पॉईंट चे अनावरण वाकडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथनाना ठमके यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या अनावरण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री विजय सदाफळ, श्री वाल्मीक लहारे, श्री दिगंबर कोते, श्री प्रमोद जाधव, श्री अमोल कापसे, स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, उपाध्यक्ष होले ताई, माजी अध्यक्ष श्री निलेश लहारे, मुख्याध्यापक श्री दिवटे सर, स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत साबळे, श्री सुनील खडके, श्री दीपक वेताळ, सदस्य पवार ताई, श्री गोरक्षनाथ बोकंद, श्री विलास म्हस्के, शाळेतील शिक्षक श्री बनसोडे सर, श्री भालके सर, श्री ईडलवार सर, श्री घोडके सर ,श्री जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ.कुमावत ताई आदि शिक्षकवर्ग, पालकवर्ग, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते, या सेल्फी बोर्ड साठी शाळेचे माजी अध्यक्ष निलेश लहारे यांनी विशेष प्रयत्न केले, शाळेच्या विकासासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, स्कूल कमिटी सदस्य यांचे पण मोलाचे योगदान आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर यांनी केले तर आभार श्री भालके सर यांनी मानले.....*

No comments:

Post a Comment