अनुक्रमणिका

Monday, August 11, 2025

साहित्यिक व त्यांची टोपण नावे.

 *🗓️ साहित्यिक व त्यांची टोपण नावे.*


◾ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी


◾ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी


◾ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन


◾ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी


◾ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत


◾ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार


◾ नारायण मुरलीधर गुप्ते - बी


◾ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू


◾ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम


◾ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी


◾ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज


◾ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस


◾ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी


◾ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी


◾ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व


◾ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व


◾ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास


◾ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी


◾ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार


◾ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर


◾ ना. धो. महानोर - रानकवी


◾ न. चि. केळकर - साहित्यसम्राट


◾ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन


◾ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज


◾ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी


🌼🌼🌼🌼🌼

Sunday, August 10, 2025

We Learn English

 

WLE 9
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
✍️  *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त.दररोज भाग डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत._*
 
🔵 📢 We Learn English 📢 🔵

            *🔴  आजचा भाग 9   🔴*

*We Learn English Part 9*
*आम्ही इंग्रजी शिकतो भाग 9*

*Tell me about yourself .(टेल मी अबाउट युवरसेल्फ)*
*स्वतःबद्दल माहिती सांग.(वहीत लिहून घे)*

खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून स्वतःबद्दल माहिती पूर्ण कर.
My name is.........
(माय नेम ईज........)
I am........
(आय अॅम.......)
I live in.....
(आय लिव्ह इन........)
I go to .......
(आय गो टू.......)
I am in class...........
(आय अॅम इन क्लास.........)
My father's name is........
(माय फादर्स नेम ईज.......)
My father is a...........
(माय फादर ईज अ.........)
My mother's name is............
(माय मदर्स नेम ईज......)
My mother is a..........
(माय मदर ईज अ........)
I have.............brother.
(आय हॅव्ह............. ब्रदर)
My brother's name is...........
(माय ब्रदर्स नेम ईज.........)
I have............. sister.
(आय हॅव्ह.............. सिस्टर)
My sister's name is...........
(माय सिस्टर्स नेम ईज........)

एक मुलगा खाली माहिती सांगत आहे ती बघ आणि स्वतःची माहिती बरोबर लिहिली का याची खात्री करून घे.
My name is Raju.
I am Ten.
I live in Pimpri Avaghad.
I go to Z. P. Primary school Pimpri Avaghad.
I am in class four.
My father's name is Ram.
My father is a Driver.
My mother's name is Rani.
My mother is a House wife.
I have one brother.
My brother's name is Ganu.
I have one sister.
My sister's name is Didi.

Sunday, August 3, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेस माजी विद्यार्थी 1992व1993 कडून 20,000 रकमेची साऊंड सिस्टम भेट देण्यात आली.

 * *जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेल्या इयत्ता चौथीच्या सन 1993- 94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून केंद्रशाळा वाकडीस साऊंड सिस्टिम सप्रेम भेट...*

--------------------------------------------

जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून एक आदर्श उपक्रमाची सुरुवात... 🌹🌹

--------------------------------------------

*आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी येथे शिकलेल्या सण 1993-94 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी उत्कृष्ट क्वालिटीची साऊंड सिस्टिम सप्रेम भेट आज देण्यात आली, यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा.कोते हे होते, यावेळी इयत्ता चौथीच्या 1993- 94 च्या बॅचमध्ये मान.श्री राजेंद्र आहेर, श्री अण्णासाहेब कोते, श्री. महेश म्हस्के ,सौ.कांचनताई गोंदकर, सौ.मायाताई शेळके, सौ.प्रेरणाताई बोठे, श्री. विजय आहेर आदि माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आलेल्या सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून दिला, आज या शाळेत शिकून आम्ही सर्वच विद्यार्थी एका चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहोत तसेच काहीजण स्वतःचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करीत आहेत यासाठी आम्ही याच जिल्हा परिषद शाळेत शिकून आज मोठे झाले आहोत त्यामुळे आम्ही या शाळेचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आम्ही आज शाळेसाठी भेटवस्तू देत आहोत, यावेळी सौ.कांचनताई गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, आता आपल्या शाळेत झालेला बदल पाहून खूप मोठा आनंद झाला असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच  दत्तगुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विजय आहेर यांनी सांगितले की शाळेच्या विकासासाठी आम्हाला केव्हाही हाक द्या आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले, या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिवटे सर, श्री.भालके सर, श्री. ईडलवार सर, श्री. जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ कुमावत ताई ,स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, मा.स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.निलेश लहारे, स्कूल कमिटी सदस्य श्री.प्रदीप जगदाळे, श्री. श्रीकांत साबळे, श्री. दीपक वेताळ, श्री. दिगंबर कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक, पालक श्री.सचिन खजिनदार यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बनसोडे सर यांनी केले, शेवटी सर्व मान्यवरांचे आभार श्री. भालके सर यांनी मानले......*


*वाकडी शाळेला १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेची भेट; साउंड सिस्टीम देत आदर्श प्रेरणा!*


*सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक;करा..👇*

 *https://ahilyanagarkhabarbaat.com/?p=6986*

Saturday, August 2, 2025

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता येथे अण्णासाहेब कोटे माजी विद्यार्थी तथा उद्योजक यांच्या देणगीतून सेल्फी पॉइंटचे उद्घाटन झाले

 ✴✴✴✴✴✴✴✴✴

*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी शाळेत आज शाळेच्या नावाचे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.....*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाकडी शाळेत शाळेसाठी आवश्यक  भौतिक सुविधा बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत, उर्वरित आवश्यक गोष्टींसाठी शाळेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे शाळेच्या गुणवत्तेत खूप वाढ झालेली आहे,आता शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू आहे,शाळेच्या प्रगतीत वाढ झाल्यामुळे पालकांचा या शाळेकडे प्रवेशासाठी ओघ वाढू लागलेला आहे, अशावेळी शाळेची डिजिटल शाळेकडे वाटचाल सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेच्या नावाचे सेल्फी बोर्ड शाळेचे माजी विद्यार्थी, वाकडी येथील शिक्षणप्रेमी नागरिक मा.श्री अण्णासाहेब पा कोते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी उपलब्ध करून दिला, शाळेच्या विकासामध्ये श्री अण्णासाहेब पा.कोते यांचे मोठे योगदान आजपर्यंत झालेले आहे, यावेळी त्यांचा यथोचित सत्कार शाळेचे आजी-माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला, आज झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी 👉I ❤ my school  Z. P. P. S wakadi👈 या सेल्फी पॉईंट चे अनावरण वाकडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथनाना ठमके यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या अनावरण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री विजय सदाफळ, श्री वाल्मीक लहारे, श्री दिगंबर कोते, श्री प्रमोद जाधव, श्री अमोल कापसे, स्कूल कमिटी अध्यक्षा सौ.मेघाताई जोशी, उपाध्यक्ष होले ताई, माजी अध्यक्ष श्री निलेश लहारे, मुख्याध्यापक श्री दिवटे सर, स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत साबळे, श्री सुनील खडके, श्री दीपक वेताळ, सदस्य पवार ताई, श्री गोरक्षनाथ बोकंद, श्री विलास म्हस्के, शाळेतील शिक्षक श्री बनसोडे सर, श्री भालके सर, श्री ईडलवार सर, श्री घोडके सर ,श्री जगदाळे सर, सौ.महांकाळे मॅडम, सौ.सदाफळ मॅडम, सौ.कुमावत ताई आदि शिक्षकवर्ग, पालकवर्ग, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते, या सेल्फी बोर्ड साठी शाळेचे माजी अध्यक्ष निलेश लहारे यांनी विशेष प्रयत्न केले, शाळेच्या विकासासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, स्कूल कमिटी सदस्य यांचे पण मोलाचे योगदान आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बनसोडे सर यांनी केले तर आभार श्री भालके सर यांनी मानले.....*